महाराष्ट्रात खेळांच्या सुविधा करण्याबाबत
सध्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये
सरकारी एक क्रीडा संकुल आहे.त्यामधील सुविधा आणि त्याचा उपयोग खालीलप्रमाणे
करण्यात यावा.
१.तालुक्यातील सर्व क्रीडा व कला शिक्षक यांची ,खाजगी
शाळेतील सुध्दा क्रीडा शिक्षक एक कमिटी स्थापन करण्यात यावी .हे काम जिल्हा क्रीडा
अधिकारी करतील .पत्येक तालुका स्तरावर १० जणांची एक कार्यकारिणी असेल जी
वर्षभराच्या कार्यक्रमाची आखणी करतील.
राज्य शासन प्रत्येक
तालुका स्तरावरील कार्यकारिणीला एकमुश्त रक्कम रुपये ५ करोड देईल.या रकमेच्या
व्याजातून हि खेळ आणि कला कार्यकारिणी काम करेल .या कार्यकारिणीला दिशानिर्देश
देण्याचे सर्व अधिकार
उप विभागीय अधिकारी,संवर्ग विकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना
राहील .
२.जिल्हास्तरीय खेळ व कला विषयी कार्यक्रमाची आखणी जिल्हा क्रीडा व
कला अधिकारी करतील व त्याचे नियोजनात्मक खर्चाची पूर्तता जिल्हाधिकारी करतील .
३.ऑलिम्पिक मधील सर्व खेळ याचा समावेश प्रत्येक तालुकास्तरावर
करण्यात येईल .
४.राज्यस्तरीय खेळ स्पर्धांचे चे नियोजन क्रीडा मंत्रालय करेल.
५.अगदी पहिल्यावर्गापासूनच्या विद्यार्थ्याला सर्व समान संधी उपलभद्ध
असेल.
६.कुठले क्रीडा ग्राउंड कसे तयार कराचे याबद्दलची माहिती व कौशल्य
बाबत मार्गदर्शन आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचेकडून
व्यवसायिक स्तरावर घेण्यात येईल.
७.राज्यस्तरीय खेळाडूंना व निवडक निपुण विद्यार्थ्यांना राज्य सरकार
योग्य तिथे व योग्य ते प्रशिक्षण देईल.
वरोरा दिनांक २९ ऑगष्ट २०२२- श्री विनय दडमल ,डॉक्टर
राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा-४४२९०७
No comments:
Post a Comment