Thursday, 6 January 2022

Quality of training by Integrated Tribal Development Project in Maharashtra

 दैनिक लोकमत दिनांक ०६/०१/२०२२ च्या पुरवणी ' हॅलो चंद्रपूर 'मध्ये पेज ४ वर ' अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना प्रशिक्षण ' या मथळ्याखाली जी बातमी छापली आहे .त्यामध्ये वित्तीय वर्ष २०२१-२०२२ जे मार्च २०२२ ला संपणार आहे करीता नामांकित प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प चिमूर जिल्हा चंद्रपूर ने मागविले आहेत व अर्ज देण्याची मुदत उद्या म्हणजे ७ जानेवारीपर्यंत आहे.त्यानंतर प्रशिक्षणार्थी कडून अर्ज मागवतील व कसेबसे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२२ मध्ये कोरोना नसेल तर सुरु होईल .एवढ्या लेट प्रशिक्षण शक्य नाही तेव्हा हा निधी परत जाईल .हे जे प्लांनिंग आहे त्याला एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालये जबाबदार नाही आहेत काय.वेळेत कुठली गोष्ट केली तर आदिवासींचा विकास होईल नाही तर नीरर्थक निववल प्रकल्प कार्यालयांना पोसून व निधी देऊन काय साध्य होणार आहे.तरिसुध्द्धा तातडीने उपाययोजना कराव्यात हि अपेक्षा आहे. वरोरा दिनांक ०६/०१/२०२२ --विनय दडमल डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा 442907



No comments:

Post a Comment

New concept in EDUCATION INDIA

🇮🇳 Concept Note (English) Title: Reforming 10+2 Education and Entrance Examination Framework for Inclusive, Skill-Based, and Transparent ...