दहावी व बारावी ची परीक्षा कशी घेणार
सरकार म्हणते आहे कि दहावी व बारावी ची परीक्षा ऑफलाईन घेणार पण सध्यातरी ते शक्य वाटत नाही .आपण वर्षभर अभ्यास ऑनलाईन पद्धतीने करायचा व परीक्षा मात्र ऑफलाईन घ्यायची हे पटण्यासारखं नाही.नंतर हा निर्णय घ्यायचा कि मागच्यावर्षी सारखाच निकाल लावायचा त्यापेक्षा परीक्षेचं पॅटर्न बदलून घरपोच प्रश्नसंच पोचहून परीक्षा घेता येईल .ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण पध्द्ती यामध्ये खुप अंतर आहे .प्रश्नसंच पालकांकडे सुपूर्द केल्यावर पंधरा दिवसामध्ये उत्तर पत्रिका पालकच शाळेत जमा करतील .शाळा त्या उत्तर पत्रिका तपासतील व निकाल लावतील.प्रश्नपत्रिका अश्या असल्या पाहिजे कि विद्यार्थ्यांना उत्तर शोधायला सर्च करावे लागेल .शाळा विद्यार्ध्याचे बारावीसाठी दहावीचे मार्क व दहावी करिता आठवी व नववीचे मार्क एकत्रित करून सरासरी पध्द्तीने निकाल लावतील..अश्या पध्द्तीचा निर्णय आताच घोषित करायला पाहिजे.परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर कुठलाही दबाव असायला नको.
वरोरा दिनांक ०८ /०१/२०२२ --विनय दडमल डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा 442907
No comments:
Post a Comment