Sunday, 16 August 2026

Common Krait snake bite death of three girls in Maharashtra


 मामुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्य यांना विनंतीपत्र

प्रति,
माश्रीमुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालयमुंबई.

विषय : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व आश्रमशाळांचे १५ दिवसांत लेखापरीक्षण (Audit), फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत सुनावणी  जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई बाबत विनंती.

मामहोदय,

सविनय नम्र निवेदन असे कीगडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन निरपराध विद्यार्थिनींना आपला जीव गमवावा लागलाही अत्यंत दुर्दैवी  गंभीर घटना असून राज्यातील आश्रमशाळांमधील सुरक्षिततापायाभूत सुविधा  प्रशासनिक व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारी आहे.

सदर घटनेची दखल घेऊन आपण संबंधित आश्रमशाळा बंद करण्याचेदोषींवर गुन्हे दाखल करण्याचे तसेच राज्यातील सर्व आश्रमशाळांचे तृतीय पक्षामार्फत (Third Party) लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिल्याबद्दल आपले अभिनंदन  आभार.

तथापिविद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षा आणि सार्वजनिक विश्वास अबाधित राखण्यासाठी खालील बाबी तातडीने राबविण्यात याव्यातअशी नम्र विनंती आहे:

  1. राज्यातील सर्व आश्रमशाळांचे तृतीय पक्षामार्फत स्वतंत्र  निष्पक्ष लेखापरीक्षण पुढील १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात यावे.
  2. गडचिरोली येथील सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत करण्यात यावीजेणेकरून पीडित कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल.
  3. सदर घटनेपूर्वी झालेल्या शाळा तपासणी  निरीक्षण अहवालांमध्ये जर सर्व सुविधा  व्यवस्था समाधानकारक असल्याचा उल्लेख करण्यात आला असेलतर त्या अहवालांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
  4. चुकीचेदिशाभूल करणारे अथवा वस्तुस्थितीविरुद्ध निरीक्षण अहवाल सादर करणारे अधिकारीकर्मचारी  संबंधित जबाबदार व्यक्तींवर तात्काळ शिस्तभंगाची  कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  5. राज्यातील सर्व आश्रमशाळांचे उपलब्ध तपासणी अहवाललेखापरीक्षण अहवाल  अनुपालन अहवाल (Compliance Reports) सार्वजनिक हित लक्षात घेऊन उपलब्ध करून देण्यात यावेत.
  6. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व आश्रमशाळांमध्ये सर्पप्रतिबंधक उपाययोजनाविद्यार्थी  कर्मचाऱ्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधातसेच नियमित सुरक्षा तपासण्या अनिवार्य करण्यात याव्यात.

महोदयआदिवासी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा अत्यंत महत्त्वाच्या आहेतत्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताची सुरक्षाजबाबदारीची निश्चिती आणि दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहेआपण या प्रकरणात विशेष लक्ष घालून वरील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावाही नम्र विनंती.

आपला विश्वासू,

VINAY DADMAL
घर क्र. ५५, स्वराजनगर,
ओंकारनगर मागेमानेवाडा रिंग रोड,
नागपूर – ४४००२७
-मेल : dadmalv2015@gmail.com

स्थळ : नागपूर
दिनांक : १५.०८.२०२६

No comments:

Post a Comment

Common Krait snake bite death of three girls in Maharashtra

  मा .  मुख्यमंत्री ,  महाराष्ट्र   राज्य   यांना   विनंतीपत्र प्रति , मा .  श्री .  मुख्यमंत्री   महोदय , महाराष्ट्र   राज्य , मंत्रालय ,  ...