खेड्यातल्या शाळा अशा टिकवाव्यात -विनय दडमल
सध्या खेड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या एका वर्गामध्ये ३० सुद्धा नाहीत .अश्या सर्व शाळांचं व्यवस्थापन ग्रामपंचायतीकडे सोपवायला पाहिजे .ग्राम शिक्षण समिती पूर्ण पणे शाळेच्या कार्यात लक्ष घालेल .त्यामध्ये सध्या जे शिक्षक अशा शाळांमध्ये कार्यरत आहेत त्यांना दुसऱ्या राज्याच्या विभागात समाविष्ट करावे.खेड्यामध्ये अशा शाळांवर तासिका तत्वावर त्याच गावातील युवक युवतींना रुपये १००/- एका तासिकेला या तत्वावर कमीत कमी रोजचे ५ पिरिअड साठी त्याच गावात रहायच्या अटीवर नेमणूक ग्रामपंचायत करेल.एका वर्षाचे आत अशा व्यक्तींना संबंधित TET पास करणे अनिवार्य राहील .या व्यक्तींचे वेतन बिल ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीला शिक्षण विभागाकडे जाऊन त्यांना नियमित पगार मिळेल .हि नोकरी अस्थायी स्वरूपाची असेल.शिक्षण विभागसुद्धा पूर्ण नियंत्रण ठेवेल.नियम व अटीचा मसुदा तयार करता येईल .अशा विद्यार्ध्यांना रुपये १००/-प्रत्येक महिन्याला विद्यावेतन १२ हि महिने मिळेल .हे सर्व पैसे त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये DBT करण्यात येईल.
वरोरा दिनांक
१३ सप्टेंबर २०२२--विनय दडमल, डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी , वरोरा-442907
No comments:
Post a Comment