Tuesday, 14 June 2022

Nagar Parishad Nivdnuk Reservation

 

प्रति ,

मुख्याधिकारी ,


नगर परिषद ,

वरोरा -442907

विषय :सोडतीतून आरक्षण नको !

होणाऱ्या नगर परिषद निवडणुकांचे सोडतीद्वारे आरक्षण जाहीर झाले आहे त्यावर सामान्य नागरिकांकडून हरकती / सूचना मागविलेल्या आहेत त्याप्रमाणे खालील हरकत / सूचना मी मांडत आहे .

सोडतीतून आरक्षणामुळे बाकीच्या समाजावर अन्याय होतो .एका प्रभागामध्ये आरक्षित अनुसूचित महिला आरक्षण आहे तर निवडून येणारी महिला फक्त त्या प्रभागाचा प्रतिनिधित्व करीत नाही तर पूर्ण शहराचं अनुसूचित महिलांचं प्रतिनिधित्व करते .म्हणून आरक्षित जागा पूर्ण शहरातून निवडल्या जाण  गरजेचं आहे.

एकूण आरक्षित जागा ६ आहेत व एकूण प्रभाग १३ आहेत .६ आरक्षित जागा साठी पूर्ण शहरातून निवडून येन गरजेचं ठरेल .प्रत्येक प्रभागामध्ये एक महिला व एक पुरुष अशे २६ जण निवडून येतील तर आरक्षित जागांमध्ये  ६ जण निवडून येतील .अशे ऐकून ३२ जण नगर परिषदेमध्ये असतील .मतदारांसाठी पहिल्या लिस्टमध्ये  एक महिला व एक पुरुष अशे मत द्यायचे आहे तर दुसऱ्यालिस्टमध्ये सुद्धा एक महिला एक पुरुष अशे मत द्यायचे आहे.दुसरी लिस्ट सर्व प्रभागासाठी एकसारखी असेल .कोणत्याही सोडतीची गरज नाही .

वरोरा दिनांक १५ जून २०२२ ----------------------विनय दडमल

पत्ता : Dr. राधाकृष्णन  शिक्षक कॉलनी ,अभ्यंकर वॉर्ड , वरोरा -४४२९०७

  dadmalv2015@gmail.com

No comments:

Post a Comment

Proposal for Self Declaration Affidavit Vinay Dadmal way

Proposal for Introducing Self-Declaration with Affidavit Facility Submitted by: Name: Vinay Dadmal Address: 55, First Floor, Swarajnagar...