आरक्षित
प्रतिनिधित्व नियम असे बदलले पाहिजेत
ग्रामपंचायत
,जिल्हा परिषद ,नगर परिषद ,महानगरपालिका येथील जे
आरक्षित प्रतिनिधित्व देण्यात येत आहे ती लॉटरी पद्धतीने
जागा आरक्षित करण्यात येत आहे व हि पद्धत
चुकीची आहे व ती बदलणे
गरजेचे आहे। समजा एका प्रभागात ST महिला आरक्षित जागा आहे तर ती महिला
फक्त त्या प्रभागाचंच प्रतिनिधित्व करीत नाही तर पूर्ण शहराचं
ST महिला प्रतिनिधित्व करीत असते शहरातील बाकी प्रभागातील महिलांना हे प्रतिनिधित्व करायची
संधी मिळत नाही त्यामुळे पूर्ण शहरात ,ग्रामपंचायत मध्ये ,जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण जागांमध्ये ज्यापण आरक्षित जागा आहेत त्या पूर्ण आरक्षित जागांसाठी सर्वच प्रभागात उमेदवार उभे करावे लागतील आणि निवडणुकीमध्ये त्या आरक्षित जागेसाठी ज्याला वयक्तिक
सर्वाधिक मते मिळतील त्या वयक्तीलाच ते आरक्षित प्रतिनिधित्व
करता येईल । यामुळे कुणावरही
अन्याय होणार नाही। आरक्षणासाठी लॉटरी पद्धत बंद होईल। त्या प्रभागातील प्रत्येक मतदाराला एक पुरुष व
एक महिला असे दोन मते द्यावे लागतील। आधार ऑथेंटिकेशन मेथोड लागू केल्यानंतर मतदाराला कोणत्याही प्रभागातील आपल्या पसंदीच्या उमेदवारास मत देता येईल
वरोरा
दिनांक ०४/०३/२०२२
-विनय दडमल ,Dr राधाकृष्णन कॉलोनी वरोरा -४४२९०७
No comments:
Post a Comment